जुन्या पिढीतला शेवटचा तारा आज सेवानिवृत्त झाला. आशिष नेहरा ने भारतीय क्रिकेट ची 18 वर्षे मनोभावे सेवा केली. 1999 मध्ये मोहम्मद अझरूद्दीन च्या नेतृत्वाखाली आशिष नेहरा कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्या नंतर त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज खेळाडूंना गोलंदाजी केली तर अनेक भारतीय कर्णधारांच्या नेतृत्वात तो खेळला. त्यात सचिन तेंडूलकर, अनिल कुंबळे, सौरभ गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली. विराट कोहली आणि आशिष नेहरा चा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. विराट कोहली लहान असतांना त्याला आशिष नेहरा च्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले होते आज त्याच विराट कोहलीच्या हस्ते आशिष नेहरा ने मोमेंटो स्वीकारला. गेल्या 18 वर्षात 12 वेळा त्याला ऑपरेशन करावे लागले, एका मुलाखतीत त्याला विचारले होते कि शरीराच्या कुठल्या भागाचे ऑपरेशन झालेले नाही तर त्यावर आशिष नेहराचे खूपच मार्मिक उत्तर होते, “जीभ”.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews